पुण्यात ‘न्यू इयर पार्टी’ दीड वाजेपर्यंतच

December 31, 2013 8:16 PM0 commentsViews: 358

party31 डिसेंबर : नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी झाली असून काही तासांचा अवधी राहिला आहे. मुंबईत 5 वाजेपर्यंत हॉटेल्स सुरु ठेवण्याची परवानगी कोर्टाने दिल्यामुळे मुंबईत जल्लोषाचा उत्साह शिगेला पोहचला आहे.

मात्र पुणेकरांच्या आनंदावर विरंजन पडले आहे. पुण्यात दीडवाजेपर्यंतच हॉटेल्स सुरु राहणार आहे. पुण्यात रात्री दीड वाजेपर्यंत हॉटेल सुरु ठेवायलाच परवानगी आहे.

कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महिलांची छेडछाड यासारखे गुन्हे घडू नये यासाठी महिला पोलिसांची विशेष गस्त असणार आहे. दारू पिऊन गाडी चालवणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

close