नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत

January 1, 2014 12:02 AM0 commentsViews: 525

31 डिसेंबर : 10…5..4..3..2..1..’हॅपी न्यू इयर SSS’ हा एकच जयघोष करत नव्या वर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. नव्या आशा-अपेक्षा, नवे संकल्प, नवे स्वप्न घेऊन आलेल्या या नव्या वर्षाच स्वागत प्रत्येक जणांनी आप-आपल्या परीने केलंय. कुठे डीजेच्या तालावर बेधुंद होऊन स्वागत झालं. तर कुठे संपूर्ण कुटुंबासोबत टीव्हीवरील कार्यक्रमाचा आस्वाद घेत नवं वर्षाचं स्वागत झालं तर कुठे ’60’,’90’ चे ग्लास रिकामे करत नव्या वर्षाचं असंही स्वागत झालं. तर कुठे ‘दारु नको, दूध प्या’ असं अर्थ आणि स्वास्थपूर्ण स्वागत झालंय.तर कुठे फेसबुक, टिवट्‌र ‘हॅपी न्यू इयर’ च्या पोस्ट अपडेट करुन स्वागत झालंय. पण या सर्वात एकच साद होती ती ‘नव वर्ष सुख आणि समृद्धीचं जावो’ या शुभेच्छाची.

वर्ष तर दर वर्षी नवं येतं पण प्रत्येक वर्ष हे नवं असतं म्हणूनच नव्या वर्षाचं स्वागत हे खास असतं. आज 2013 चा सूर्य अस्ताला गेला. जगाच्या पाठीवर नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत झालं ते ऑस्ट्रेलियापासून. सिडनीत नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत झालंय. सिडनीच्या ऑपेरा हाऊस आणि हार्बर ब्रिजवर डोळे दिपून जाणारी रोषणाई करण्यात आली होती. ‘याची देही याचा डोळा’ असा हा आतषबाजीचा सोहळा सिडनीकरांनी डोळ्यात साठवून नव्या वर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलंय. भारताच्या अतिपूर्वेला असलेल्या सिडनीचं घड्याळ भारताच्या आधी साडेपाच तास असतं. त्यामुळे ‘2014’ चे आगमन झालं आणि काही  तासांतच या नव्या वर्षानं संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतलं.

भारतात नव वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी झाली. देशाची आर्थिक राजधानी अर्थात मुंबईत नवं वर्षाच्या स्वागत काही खासचं असतं. मुंबईत पहाटे पाच पर्यंत नव वर्षाच्या स्वागतासाठी परवानगी मिळाल्यामुळे ‘पार्टी ऑल नाईट’ असंच वातावरण आहे. सर्व हॉटेल्स रेस्टॉरंट गर्दीने खच्चा खच भरलीय. तर मुंबईला अथांग लागलेल्या समुद्र किनार्‍यावर लोकांनी एकच गर्दी केली आहे. तर मुंबईचं ‘क्वीन ऑफ नेकलेस’ समजल्या जाणार्‍या मरीन ड्राईव्ह गर्दीने फुलून गेले आहे. जल्लोष करण्यासाठी तरुण, तरुणी इथं जमलेत. तर पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमध्ये वेळेची मर्यादा लक्षात घेता मोठ्या जल्लोषात नव्या वर्षाच स्वागत करण्यात आलंय. अशा या नव्या वर्षाच्या मोठ्या जल्लोषात स्वागत झालंय. आयबीएन लोकमत परिवाराकडून तुम्हा सर्वांना हे नवं वर्ष सुख आणि समृद्धीचं जावो..हॅपी न्यू इयर..!!

close