राज्यसरकारची आर्थिक स्थिती बिकट

February 19, 2009 4:47 AM0 commentsViews: 9

19 फेब्रुवारी मुंबईराज्य सरकारच्या महसुली उत्पन्नात घट झाल्यानं सरकारची आर्थिक स्थिती बिकट असल्याचं सिद्ध झालंय. त्यामुळे सरकार आता खुल्या बाजारातून निधी उभारणार आहे. रिझर्व बँकेच्या माध्यमातून राज्यसरकार पाच हजार दोनशे कोटी रुपये उचलणार आहे. राज्य सरकारी कर्मचा-यांना सहावा वेतन आयोग लागू केल्यानंतर सरकारी तिजोरीवर कोट्यवधींचा बोजा वाढलाय. तसंच बिकट आर्थिक परिस्थितीमुळे सरकारनं तेराव्या वित्त आयोगाकडे दीड लाख कोटी रुपयांची मागणीही केल्याची माहिती अर्थमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

close