आई वडिलांना न सांभाळणा-या मुलाला 3 महिने कारावास

February 19, 2009 5:14 AM0 commentsViews: 6

19 फेब्रुवारी मुंबईवृद्ध आई-वडिलांना न सांभाळणा-या मुलांना तीन महिने सक्त मजुरी किंवा पाच हजार रुपये दंड करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. रात्री उशिरा सुरू झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. एरवी दिवसा होणारी ही बैठक रात्री पावणे दहाला सुरू झाली आणि रात्री एक वाजता संपली. या निर्णयासहित मुंबईतील फाईव्ह स्टार हॉस्पिटल्समध्ये गरीब रुग्णांना दाखल करून न घेणा-यांवर सहा महिने कारावास आणि 25000 रुपये दंड आकारण्याचा निर्णयही घेण्यात आला. यात जसलोक, बॉम्बे हॉस्पिटल आणि ब्रिच कॅन्डी या हॉस्पिटल्सचा समावेश आहे.

close