मुंबईत ५७० तळीरामांवर कारवाई

January 1, 2014 11:10 AM0 commentsViews: 736

drink and drive 1 जानेवारी : थर्टीफस्टच्या रात्री मद्यधूंद अवस्थेत वाहन चालवणा-या ५७० तळीरांमावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली.

मद्याचे प्याले रिचवत नववर्षांचे स्वागत करणा-यांची संख्या वाढत आहे. मद्यधूंद अवस्थेत गाडी चालवून अपघात होत असल्याने थर्टी फस्टच्या रात्री पोलिसही या तळीरामांवर नजर ठेवतात. मुंबई आणि पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत ८२३ तळीराम पोलिसांच्या कचाट्यात अडकले आहेत.

यात मुंबईत ५७० तर पुण्यात २५३ तळीरामांवरील कारवाईचा समावेश आहे. यातील ६२ केसेस या बेदरकारपणे वाहन चालवणे तर ४ केसेस भरधाव वेगात गाडी पळवल्याप्रकरणी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

close