‘त्या’ बलात्कार पीडितेचा मृत्यू

January 1, 2014 1:22 PM1 commentViews: 410

Image img_235722_junnarrapecase3244_240x180.jpg1 जानेवारी : दोन महिन्यापूर्वी कोलकात्यात एका 16 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर तिने स्वत:ला जाळून घेतले आणि गेल्या आठवडाभरापासून ती मृत्युशी झुंज देत होती. अखेर उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला.

या अल्पवायीन मुलीवर 26 ऑक्टोबरला 6 नराधमांनी अत्याचार केला. या प्रकरणी या प्रकरणी 6 आरोपींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पण आरोपीच्या गुंडांनी या मुलीला खटला मागे घेण्यासाठी सतत धमक्या देत होते. यालाच कंटाळून या मुलीनं 23 डिसेंबरला स्वत:ला जाळून घेतलं होतं.

कोलकात्यात आर. के. कर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये या मुलीवर उपचार सुरू होते. पण, डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणामुळेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. मुलीच्या वडिलांनी हॉस्पिटलचे सुप्रीटेंडंट आणि आरोग्य खातं असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. या सगळ्या प्रकरणाविरोधात आता सगळीकडे संताप व्यक्त होत आहे. या सगळ्या प्रकरणाविरोधात लोक आता रस्त्यावर उतरले आहेत.

  • Roshani Bafna

    All systems are highly corrupted. Since last 28 years experience. “Melelya maansanchya taluvaril loni khanare aahet”

close