सुशीबेन शाहांच्या नियुक्तीवर ‘आप’चा वाद

January 1, 2014 4:55 PM0 commentsViews: 438

mahila aayoga vs aap01 जानेवारी : राज्य महिला आयोगाला तब्बल चार वर्षांनतर अध्यक्षा मिळाल्या खरा…पण या पदावर सुशीबेन शाह यांची झालेली निवड आता वादात सापडली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यापूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महिला संघटनांशी चर्चा करणं आवश्यक होतं असं पत्र आम आदमी पार्टीने मुख्यमंत्र्यांना लिहीलं आहे.

महिलांच्या अत्याचारांच्या घटनांकडे सरकार गांभीर्याने पाहत नाहीये हेच निवडीवरून सिद्ध होतंय असं ‘आप’चं म्हणणं आहे. याविरोधात राज्यातल्या सगळ्या महिला संघटनांनी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे, असंही आपच्या सदस्यांनी सांगितलंय. तर मुख्यमंत्र्यांनी महिला संघटनांचे मत विचारात घ्यायला हवं होतं असं शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोर्‍हे यांनी म्हटलं आहे.

close