एमएमआरडीए प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशीची मागणी

February 19, 2009 5:58 AM0 commentsViews: 1

19 फेब्रुवारी मुंबईएमएमआरडीएमध्ये आत्महत्या करणा-या संतोष भोसले प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करण्यात येत आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे सदस्य आणि स्थायी समितीचे अध्यक्ष रवींद्र वायकर यांनी एमएमआरडीएच्या एकूण कारभारावर ताशेरे ओढलेत. तिथल्या अधिका-यांची आता सीआयडी चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केलीय. तसंच एमएमआरडीचे सदस्य आणि भाजपचे नगरसेवक आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांनीच याप्रकरणी लक्ष घालून चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे.भोसले यांच्या आत्महत्येला जबाबदार ठरवलेल्या वंदना सूर्यवंशी यांची बदली करण्यात आली. पण बदली म्हणजे कारवाई होत नाही, अशी टीकाही प्राधिकरणाच्या सदस्यांनी केली आहे.आता एमएमआरडीएच्या माजी पुनर्वसन अधिका-यांच्या प्रशासकीय चौकशीची मागणी आंदोलकांबरोबरच प्राधिकरणाच्या सदस्यांनीही केली आहे. त्यामुळे एमएमआरडीएची आगामी मीटिंग नक्कीच वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

close