3 कोटींची विक्री

January 1, 2014 8:40 PM0 commentsViews: 95

01 जानेवारी : नंदुरबार जिल्ह्यातल्या सारंगखेडा यात्रेतल्या घोड्यांच्या बाजारात यंदा तब्बल 3 कोटी 62 लाख रुपयांची विक्रमी विक्री झाली आहे. दत्तजयंती निमित्तानं भरणार्‍या या यात्रेत यंदा 2 हजारांहुन अधिक घोड्यांची खरेदीविक्री झाली. पुष्कर मेळ्यानंतर देशातला हा दुसर्‍या क्रमांकाचा घोडेबाजार मानला जातो. यंदाच्या या बाजारात राजस्थानातील पुष्कर, बिहारमधला सोनपूर, पंजाबमधल्या मुक्सद तर महाराष्ट्रातल्या पंढरपूर आणि माळेगाव या ठिकाणचे प्रसिद्ध जातीवंत घोडे आणण्यात आले होते. देशभरातल्या घोडे शौकीनांसह स्टडफार्म मालकही या बाजारात आवर्जून उपस्थित होते.

close