राष्ट्रवादी 22 जागांवर ठाम

January 1, 2014 9:59 PM0 commentsViews: 908

sharad pawar4401 जानेवारी : लोकसभा निवडणुकीचे वेध सर्वच पक्षांना लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीये. यासंदर्भात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 5 आणि 6 जानेवारीला आढावा बैठक बोलावली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात लोकसभेच्या 22 जागा लढवण्यावर ठाम आहे. त्या जागांचा आढावा पक्षातर्फे घेतला जाणार आहे.

त्या बैठकीत संभाव्य उमेदवारांची यादी निश्चित केली जाणार आहे. या बैठकीला शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासह पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बरीच वादावादी झालीये.

राष्ट्रवादीसाठी फक्त 19 जागा सोडाव्यात असा राज्यातल्या काँग्रेस नेत्यांचा आग्रह आहे. तर राष्ट्रवादी 22 जागावर ठाम आहे. त्यामुळे या बैठकीत काय तोडगा काढला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

close