‘काँग्रेस का हाथ ‘आप’के साथ’?

January 2, 2014 10:15 AM0 commentsViews: 2370

Kejriwal3LL02 जानेवारी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवर आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. यात काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार आहे.त्यामुळे केजरीवाल आणि आम आदमी पर्टीसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह इतर मंत्र्यांनी काल बुधवारी दिल्ली विधानसभेत पदाची शपथ घेण्याची औपचारिकता पूर्ण केली. त्याच बरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य मतिन अहमद यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नायब राज्यपाल नजीब जंग यांनी बुधवारी निवड केली.

‘आप’च्या विश्वासदर्शक ठरावाला आम्ही पाठिंबा देण्याच्या निर्णयावर ठाम असून पुनर्विचार करण्याची गरज नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरविंदसिंह लव्हली यांनी सांगितले आहे. त्यामुळे ‘आप’ सरकारवरचं संकट सध्या तरी टळल्याचं दिसत आहे.

‘आप’चे 28 आमदार असून त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आठ आमदारांची गरज आहे. ती गरज काँग्रेसने 18 पैकी 16 अटी मान्य करून बाहेरून पाठिंबा देत भरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, ‘आप’च्या आमदारांनी सभागृहात ‘आप’च्या टोप्या घालण्यावर विरोधकांनी काल आक्षेप घेतला होता. त्याचबरोबर विधानसभेत शपथ ग्रहण केल्यानंतर केजरीवाल तब्येत बरी नसल्याने लगेचच निघून गेले त्यावर काँग्रेस आणि भाजपने केजरीवाल यांच्यावर टीका केली.

close