‘मार्ड’चे निवासी डॉक्टर्स संपावर

January 2, 2014 2:20 PM6 commentsViews: 416

Image img_236972_marddoctorstrickeback4_240x180.jpg02 जानेवारी : राज्यातील जवळपास 4000 निवासी डॉक्टर्सनी बेमुदत संप पुकारला आहे. सोलापूरमधल्या एका निवासी डॉक्टरला पोलिसांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ निवासी डॉक्टर्सनी हे पाऊल उचललं आहे. या दरम्यान सर्व वैद्यकीय महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय ‘मार्ड’ने घेतला आहे.

सोलापूरमध्ये एका हॉस्पिटलमध्ये पोलीस एका निवासी डॉक्टरला मारहाण करत असल्याचे आणि त्याचा गळा पकडत असल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार डॉ. प्रशांत पाटील या डॉक्टरने सोलापूरच्या सिव्हील हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर प्रसूती वेदना होत असतानाही महिलेवर उपचार करण्यास नकार दिला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला मारहाण केली.

याचा निषेध करत ‘मार्ड’ने आज संप पुकारला आहे. संबंधित पोलिसांना अटक करावी अशी ‘मार्ड’ची मागणी आहे. मात्र, यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होणार आहेत. पण या घटनेमुळे निवासी डॉक्टर्सच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 • kiran nikam

  tya jaagi…tya dr. che aai, bahin..mulgi etc koni aste……tar tyache uttar hech aste ka…”ki majhi shift sampali aahe manun “

  • dajee lokare

   ho re mitra tu kon ahes tula medicos life baddal kay mahit ahe ka

  • Shrihari Halnor

   are mitra labour room 24 hour chalu aste tikde ghevun jayche tyache doc vegle astat tyanche kaam 24 hr tech aste
   doc kay tichi delivery ughdyavar karnar hota kay hatatla ct scan la anlela pateint sodun
   you educated moron

  • Pankaj

   होय रे मित्रा,त्या डॉक्टर ची आई बहिण मुलगी असती तर तो बिचारा तिथ नसलाच असता….duty सोडून कुटुंबाकडे बघण्याची परवानगी कुठ आहे त्याला?तो तर पोलिसांकडून नाहीतर रुग्णांच्या नातेवाईकांकडून मार न खाण्यासाठी तारेवरची कसरत करत असतो…जणूकाही एवढ्या भयंकर compitition मधून तावून सुलाखून PG ची seat घेऊन आणि तरीसुद्धा ८० – ८४ तास(आठवड्याचे)काम करून त्याने आयुष्याची मोठी घोडचूक केली आहे..३-४ दिवस सरकारी हॉस्पिटल च्या रेसिडेंट डॉक्टर quarters वर जाऊन राहून बघ कि रे मित्रा

 • Pritam

  The doctor was of Surgery department while the patient was of obstetrics department. .!!!
  The pregnancy case don’t come under his area of treatment.
  Doctor haven’t denied but asked to call the respective obstetric docor insted.

 • Pritam
close