गुंडप्पा विश्वनाथ यांना जीवन गौरव पुरस्कार

February 19, 2009 6:33 AM0 commentsViews: 7

19 फेब्रुवारीबीसीसीआयतर्फे माजी टेस्ट क्रिकेटर गुंडप्पा विश्वनाथ यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. मुंबईत हा सोहळा झाला.1970च्या दशकात सुनील गावस्करच्या बरोबरीने भारतीय बॅटिंगचे ते आधारस्तंभ होते. 1969मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी भारतीय टीममध्ये पदार्पण केलं. आणि पहिल्याच टेस्टमध्ये सेंच्युरी करण्याचा पराक्रम केला होता.याच सोहळ्यात भारताचा धडाकेबाज ओपनर वीरेंद्र सेहवागला पॉली उम्रीगर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. यावेळी धोणीच्या विशेष कामगिरीबद्दल बीसीसीआयतर्फे त्याला गौरवण्यात आलं. धोणीच्या नेतृत्वाखाली भारतीय वन डे टीमनं सलग नऊ विजय मिळवत इतिहास रचला. भारताचा सर्वात यशस्वी कॅप्टन म्हणून धोणीचं नाव लिहिलं गेलंय. शिवाय धोणीला यावर्षी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं होतं. धोणीबरोबरच टेस्ट क्रिकेटमध्ये 300 विकेट घेण्याचा टप्पा गाठणा-या आणि पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित झालेल्या हरभजन सिंगचाही बीसीसीआयनं सत्कार केला.

close