जिओ टीव्हीच्या रिपोर्टरची हत्या

February 19, 2009 6:49 AM0 commentsViews: 3

19 फेब्रुवारीपाकिस्तानमध्ये वायव्य सरहद्द प्रांतातल्या स्वात भागात जिओ टीव्हीच्या रिपोर्टरची हत्या करण्यात आली आहे.मुसा खान असं या रिपोर्टरचं नाव आहे. तालिबानी अतिरेक्यांनी ही हत्या केल्याचा संशय आहे. पाकिस्तान सरकारनं स्वातमध्ये शांततेच्या बदल्यात शरीयत कायदा लागू करायला परवानगी दिली होती. असा समझोताही तालिबान आणि पाक सरकार दरम्यान झाला होता. पण त्यानंतर आठवडा लोटायच्या आतच तालिबाननं समझोता धाब्यावर बसवला आहे.

close