87 व्या मराठी साहित्य संमेलनाचं आज उद्‌घाटन

January 3, 2014 11:35 AM0 commentsViews: 205

sahitya samellan03 जानेवारी : 87वं अखिल भारतीय मराठी साहित्य  संमेलनासाठी पुणे जिल्ह्यातल्या सासवडमध्ये सारस्वतांचा मेळा भरला आहे. सकाळी सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार करणार आहेत. संमेलनाध्यक्ष फ.मु. शिंदे, मावळते संमेलनाध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नगरीतल्या वेगवेगळ्या भागांचे नामकरण करण्यात आले आहे. एकूणच सर्वांना खूश करण्याचा प्रयत्न संयोजकांनी केलेला दिसतो. साहित्यिक, व्हीआयपी, रसिक आणि विद्यार्थ्यांसाठी आसनव्यवस्थाही उत्कृष्ट करण्यात आली आहे.

close