अभिनेत्री अलका पुणेवार बेपत्ता

January 3, 2014 12:05 PM0 commentsViews: 4294

alka punekar03 जानेवारी : मराठी अभिनेत्री अलका पुणेवार या गेल्या आठवड्यापासून बेपत्ता आहेत. त्यांची गाडी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या मार्गावर खोपोलीतील खोल दरीमध्ये चेंदामेंदा झालेल्या अवस्थेत सापडली आहे. पण पुणेवार यांचा काहीच पत्ता लागला नाहीये. याप्रकरणी ठाण्यातील कोपरी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अभिनेत्री अलका पुणेवार त्याच्या ठाण्याहून पुण्याला जायला निघाल्या होत्या. पण त्या पुण्याला पोचल्याच नाहीत. पुणेवार यांचा फोनही लागत नसल्याने त्यांच्या पती संजय पुणेवार यांनी याविषयी कोपरी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केलीय. अलका पुणेवार यांनी बवंडर, गदर यासारखे हिंदी सिनेमे आणि तुझसे लागी लगन या मालिकेत काम केले आहे.

close