भारतात समुद्रमार्गे हल्ल्यांची शक्यता-नौदल प्रमुख

February 19, 2009 3:57 AM0 commentsViews: 16

19 फेब्रुवारी मुंबई हल्ल्यानंतरही भारताला समुद्रमार्गानं अतिरेकी हल्ल्याचा धोका कायम आहे. आण्विक हल्ल्यासाठी अतिरेकी संघटना समुद्रमार्गाचा वापर करू शकतात, असा इशारा नौदल प्रमुख ऍडमिरल सुरीश मेहता यांनी दिलाय. आण्विक हत्यारांची समुद्रमार्गे तस्करी होऊ शकते. त्यामुळे मालवाहतूक जहाजांवर करडी नजर ठेवणं गरजेचं आहे. पण यासाठीच्या सुरक्षेबाबत भारतातलं एकही बंदर सज्ज नाही ही वस्तुस्थिती आहे. मध्यंतरी केंद्रीय मंत्रिमंडळानं सागरी सुरक्षेचं केंद्रीकरण करायला मान्यता दिली होती. याचा अर्थ नेव्ही, कोस्ट गार्ड, आणि सागरी पोलीस यांच्यात परस्पर समन्वय वाढवला जाणार आहे.

close