दिल्ली विधानसभेचं अध्यक्षपद ‘आप’कडेच

January 3, 2014 4:46 PM1 commentViews: 634

ms dheer03 जानेवारी : दिल्ली विधानसभेत बहुमताची लढाई जिंकल्यानंतर आम आदमी पार्टी आणखी एका ‘परीक्षेत’ पास झाली. आम आदमी पार्टीचे नेते एम.एस. धीर यांची दिल्ली विधानसभा अध्यक्षपदी निवड झालीय. त्यांना 37 मतं मिळाली.

काँग्रेसनंही त्यांना पाठिंबा दिला. काँग्रेसचे 7, अपक्ष 2 आणि आम आदमीचे 28 आमदारांनी पाठिंबा देत एकूण 37 मत मिळवून धीर विधानसभा अध्यक्षपदी विराजमान झाले. धीर यांनी भाजपच्या जगदीश मुखी यांची पराभव केला. विधानसभेचे अध्यक्ष हे सत्ताधारी पक्षाचेच असावेत असा आग्रह ‘आप’नं धरला होता.

मात्र भाजपने विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीत जगदीश मुखी यांना मैदानात उतरवले होते. भाजपचे उमेदवार जगदीश मुखी चार वेळा अध्यक्ष राहिले आहे. भाजपने निवडणुकीत सर्वाधिक 31 जागा जिंकून मोठा पक्ष ठरला. त्यामुळे जगदीश मुखींचा विजय निश्चित मानला जात होता. तर आम आदमीने 28 जागा जिंकून विधानसभेच्या लढाईत उतरली. यात काँग्रेस आणि अपक्षांनी आपली मत आपच्या पारड्यात टाकली. या बळावर ‘आप’ने गुरुवारी विश्वासदर्शक ठराव तर जिंकला त्यापाठोपाठ आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही जिंकली.

  • eqeqeqe

    very good

close