भाजप डिझास्टरसाठी सज्ज : मुंडेचा आक्रमक पवित्रा

February 19, 2009 8:49 AM0 commentsViews: 28

19 फेब्रुवारी, मुंबई भाजप-सेनेतला वाद ऐरणीवर आल्याची चिन्ह आहेत. भाजप कुठल्याही राजकीय डिझास्टरसाठी सज्ज असल्याचा विश्वास भाजप नेते गोपिनाथ मुंडे यांनी व्यक्त केलाय. त्यांनीआयबीएन-लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी,भाजपही सज्ज असल्याचं सांगितलंय. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीची काल चर्चा होती. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची चर्चा बर्‍याच दिवसांपासून सुरु आहे.शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाला तर शिवसेनेनं अनेकवेळा जाहीर पाठिंबा दिलाय.त्यामुळं भाजप-शिवसेना युती तुटणार की राहणार अशी चर्चा सुरु आहे.शिवसेनेनं साथ सोडली तर भाजपही सज्ज असल्याचे संकेत मुंडेंनी दिले.आम्ही मित्रपक्ष बदलू इच्छित नाही ना मित्रपक्ष बदलणार आहोत. राजकीय समीकरणं बदलली तर बदलेल्या राजकीय समीकरणांचा विचार आम्ही समीकरणं बदलल्यावर करू, " असं मुंडे भाजप-शिवसेना युती तुटणार की राहणार या चर्चेला उत्तर देताना म्हणाले. यावरून शिवसेना मानसिक दृष्ट्या भाजपपासून दूर गेली तर काय करावं याची तयारी भाजपनं सुरू केली आहे. तसंच शिवसेनेला भाजपबरोबर युती करायचीय की राष्ट्रवादीबरोबर हेही शिवसेनेला भाजपनं स्पष्ट करायला सांगितली आहे. गेल्या 25 वर्षांची युती इतक्या सहजासहजी तुटेल असं वाटलं नव्हतं. अनेकवेळा ही युती प्रमोद महाजन यांनी टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. पण सत्तेची समीकरणं सध्या बदलत असल्याचे संकेत गोपीनाथ मुंडेनी दिले. " शिवसेनेशी आमची युती व्हावी, असं आम्हाला 101 टक्के वाटतं. पण सत्तेची समीकरणं बदलली तरी त्या बदलत्या समीकरणांचा आम्हाला विचार करावा लागणार आहे. शिवसेना – भाजपयुती मधलं जागा वाटापाचं प्रमाण पहिलं तर विधानसेभेसाठी शिवेसना 171 जागांवर निवडणुका लढवते. उरलेल्या जागांवर भाजप विधानसभेसाठी निवडणुका लढवतात. लोकसभा निवडणुकींसाठी शिवसेना 21 जागांवर निवडणुका लढवते. तर भाजप 48. शिवसेनेनं जर भाजपशी युती तोडली तर आम्हाला जागांवरही परत विचार करावा लागेल, " मुंडे म्हणाले.

close