संमेलनाध्यक्षांना डॉ.दाभोलकरांचा विसर, खेदही नाही !

January 3, 2014 8:11 PM0 commentsViews: 615

samelan saswad03 जानेवारी : कर्‍हेच्या काठावर 87 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला मोठा दिमाखात सुरूवात झाली पण ज्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्राणाची आहुती दिली त्या डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा साहित्यकांना विसर पडल्याची बाब समोर आलीय.

डॉ.नरेंद्र दाभोलकर साधना साप्ताहिकाचे संपादकही होते. पण तरीही संमेलनाध्यक्ष फ.मु.शिंदे ते कोणत्याही साहित्यिकांनी आपल्या भाषणात दाभोलकरांचा साधा उल्लेखही केला नाही. दाभोलकर हे सामाजिक कार्यकर्तेच नाही तर लेखकही होते. यशस्वी संपादकही होते. दाभोलकर हे संपादक आणि लेखक म्हणून काम सुरु असताना बळी गेल्याची महाराष्ट्रात पहिली घटना आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने जादूटोणा विरोधी कायदाही पास केला. त्यामुळे या संमेलनात दाभोलकरांचा उल्लेख होणे गरजेचा होता. पण तसं काही झालं नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे अशी प्रतिक्रिया साहित्यिक राजन खान यांनी दिली.

तसंच या संमेलनाला जत्रेचं स्वरुप आलंय, मनोरंजनाच आणि करमणुकीचं स्वरुप आलं आहे अशा जत्रेत दाभोलकरांचा उल्लेख होणे अट नाही कारण जत्राही उन्मादासाठी असते अशी बोचरी टीकाही राजन खान यांनी केली.

सासवडच्या आचार्य अत्रे नगरीत आजपासून सारस्वताच्या मेळ्याला सुरुवात झालीय. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते संध्याकाळी पावणे पाच वाजता संमेलनाचं उद्घाटन झालं. संमेलनाचा उद्घाटच्या कार्यक्रमात शरद पवार, सुप्रिया सुळे, रामदास आठवले, विजय शिवतारे असे अनेक नेते उपस्थित होते. अध्यक्षस्थानारुन भाषण करताना फ मु शिंदे यांनी साहित्य संमेलनात राजकीय नेत्यांच्या सहभागाचं समर्थन केलं. तर साहित्यिकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपावं, असं आवाहन शरद पवारांनी केलं. घाशीराम कोतवाल आणि सखाराम बाईंडरचा दिला दाखला. फ. मु. शिंदे यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या भाषणात दाभोलकरांच्या खुनाचा साधा उल्लेखही केला नाही. यावरुन अनेक स्तरांतून टीका सुरू झालीय. त्यामुळे अखेर फ.मु. शिंदेंनी सारवासारव केलीय.  डॉ. दाभोलकरांचा जाणीवपूर्वक टाळला नाही तो राहून गेला असं मोघम उत्तर शिंदेंनी दिलं.

या प्रश्नांची उत्तरं कोण देणार?

 • - अध्यक्षांच्या भाषणात डॉ. दाभोलकरांचा साधा उल्लेखही का नाही?
  – डॉ. दाभोलकर यांचा विसर पडल्याबद्दल अध्यक्ष फ.मुं.शिंदे खेद का व्यक्त करत नाही?
  – संमेलनाच्या व्यासपीठावरच्या राजकारण्यांच्या भाऊगर्दीचं समर्थन करणं योग्य आहे का?
  – हे साहित्य संमेलन आहे की राष्ट्रवादीच्या नेत्यांचं संमेलन आहे?
  – संमेलनाला राजकीय आणि आर्थिक आशीर्वाद मिळावा, म्हणून नेत्यांचं लांगूलचालन होतंय का?
  – संमेलनातल्या चर्चांमध्येही राजकीय पार्श्वभूमीच्या लोकांचा भरणा का?
  – मराठी साहित्य संमेलन हा सुमार कुवतीच्या माणसांचा मेळा झालाय का?

 

close