अशोक चव्हाणांची ‘आदर्श’ सुटका

January 3, 2014 8:33 PM0 commentsViews: 1022

asokh chavan  free03 जानेवारी : आदर्श सोसायटी घोटाळा चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काँग्रेसने क्लीन चिट दिली आहे. अशोक चव्हाण यांनी आपल्या अधिकारात निर्णय घेतल्याचं अहवालात स्पष्ट झालंय.

त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या पाठिशी पक्ष भक्कमपणे उभा आहे. ते ही पक्षासाठी जोमाने काम करतील असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जाहीर केलंय. अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन माणिकराव ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली. आदर्श प्रकरणी अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदावरुन पाय उतार व्हावे लागले होते.

हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने आदर्श न्यायालयीन चौकशी अहवाल नाकारला होता. पण काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आक्षेप घेतल्यानंतर राज्य सरकारला अहवाल अंशत: स्वीकारावा लागला. पण अहवाल स्वीकारत राज्य सरकारने अशोक चव्हाण यांच्यावरील ठपका स्वीकारला पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही असं स्पष्ट केलं. त्यामुळे अशोक चव्हाणांच्या पक्षात परतीचा मार्ग एकाप्रकारे मोकळा करण्यात आला. आता काँग्रेसने क्लीन चिट दिलीमुळे अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरले तर नवल वाटू नये असंच म्हणावे लागेल.

close