‘आम आदमी’चं आमिरने केलं कौतुक

January 3, 2014 7:55 PM0 commentsViews: 1567

amir on kejriwal03 जानेवारी : दिल्लीची निवडणूक ऐतिहासिक ठरली ती आम आदमी पक्षामुळे..आम आदमीने पहिल्याच निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलं एवढंच नाही तर सत्ताही स्थापन केली. आम आदमी पार्टीला मिळालेल्या यशाबद्दल मी.परफेक्टनिस्ट अभिनेता आमिर खान याने आनंद व्यक्त केला असून ‘आप’चं तोंडभरून कौतुक केलंय.

सगळीकडे निराशेनं ग्रासलेलं वातावरण असताना ‘आप’नं एक क्रांती केलीय, त्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थित आशेचा किरण निर्माण झालाय. लोकांना परिवर्तन पाहिजे आहे, `सत्यमेव जयते` हा कार्यक्रम करत असताना मला लोकांच्या या भावनेची कल्पना आली असं आमिरनं `मीड डे` या इंग्रजी दैनिकाशी बोलताना म्हटलं आहे.

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण आणि अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे देशभर जागृती निर्माण झाली असं मतही आमिरने व्यक्त केली. दिल्लीत रामलीला मैदानावर अण्णा हजारे उपोषणाला बसले होते तेव्हा आमिरनं दिल्लीत जावून अण्णांना पाठिंबा दिला होता.

close