साईंच्या चरणी 3 कोटी अर्पण

January 3, 2014 10:23 PM0 commentsViews: 1728

03 जानेवारी : नवीन वर्षाच्या निमित्तानं साई बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत साई भक्तांनी मोठी गर्दी केली होती. या साई भक्तांनी दोनच दिवसात तब्बल 3 कोटी 78 लाख रुपयांची देणगी साईंच्या चरणी अर्पण केलीय. या वर्षीच्या नाताळच्या सुट्‌ट्यांमध्येही मोठ्या प्रमाणात भाविक साईबाबांच्या दर्शनाला आले होते. गेल्या 10 दिवसांमध्ये लाखो भक्तांनी 16 कोटी 77 लाखांचं दान साईबाबांच्या चरणी वाहिलंय. त्यात जवळ सव्वादोन किलो सोनं आणि 21 किलो चांदीचा समावेश आहे.

close