रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची डॉक्टरांना मारहाण

January 4, 2014 1:20 PM0 commentsViews: 546

235235kolhapu3404 जानेवारी : सोलापुरात डॉक्टराला मारहाण प्रकरण शांत होत नाही तेच कोल्हापुरात आणखी एका डॉक्टराला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातील कोथळी गावाताल्या या महिलेनं सासरच्या जाचाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली. उज्ज्वला कांबळे असं या मृत महिलेचं नाव आहे.

मात्र ज्यावेळी तिचं पार्थिव कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा या महिलेच्या माहेरच्या लोकांना राग अनावर झाला आणि त्यांनी रुग्णालयातल्या डॉक्टरांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं पुढचा अनर्थ टळला. या मारहाणीच्या निषेधार्थ आज सीपीआरमधल्या डॉक्टरांनी निदर्शनं केली.

मार्डनंही या घटनेचा निषेध केला आहे. दरम्यान, डॉक्टरांना मारहाण करणार्‍यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर डॉक्टरांनी कामबंद आंदोलन मागे घेतलं आहे. त्यामुळे सीपीआर रुग्णालयातील रुग्णांचे होणारे हाल टळलेत. मात्र असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी सीपीआर रुग्णालयात पोलीस ठाणे द्यावे अशी मागणी डॉक्टरांनी केलीय.

close