26 जानेवारीपासून राज्यात अन्नसुरक्षा लागू होणार

January 4, 2014 2:34 PM0 commentsViews: 415

FOOD BILL NEW43304 जानेवारी : अखेर येत्या 26 जानेवारीपासून अन्नसुरक्षा कायद्याची राज्यात अंमलबजावणी करणार असल्याचे अन्न पुरवठा नागरी मंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केलंय. ते बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहेकर येथे माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या गौरव सोहळ्या निमित्त आले असताना बोलत होते.

शुक्रवारीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली आणि त्याच बैठकीत अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी 26 जानेवारी पासून करायचे ठरवलंय. या योजनेचा फायदा सव्वा अकरा कोटी जनतेला मिळणार असून आता 26 जानेवारीला पहिल्या टप्प्यात 7 कोटी नागरिकांना लाभ मिळणार आहे.

तसंच प्रतिमाणसी 5 किलो प्रमाणे धान्य मिळणार आहे. 2 रु .किलो दराने गहू, 3 रु. किलो दराने तांदुळ मिळणार आहेत. अन्नसुरक्षा कायद्याची राज्यात अंमलबजावणी करण्याची डेडलाइन राज्य सरकारकडून डिसेंबर महिन्यातच हुकली होती. यावर तातडीने हालचाली करत आता राज्य सरकारने 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधला आहे.

close