शरद पवार म्हणजे एक धोकायंत्र – राज ठाकरे

February 19, 2009 11:06 AM0 commentsViews: 2

19 फेब्रुवारी, नाशिक शरद पवार म्हणजे एक धोकायंत्र आहे, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये बोलताना केलीये. काँग्रेसबरोबर जागावाटपावरून राष्ट्रवादीची रस्सीखेच तसच रोज नवी समीकरणं आणि भाजप सोडून कोणाबरोबरही युती करण्याचे पवारांनी दिलेले संकेत, यावर राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय. शरद पवारांनी जी स्टेटमेन्टस् केली आहेत. ती सगळ्या वर्तमानपत्रात वेगवेगळी आहेत. एका वर्तमानपत्रात शिवसेनेशी युती करणार नाही. दुस-या वर्तमानपत्रात भाजप सोडून दुस-या कोणत्याही पक्षाशी युती करणार. तर तिस-या वर्तमानपत्रात अजून काहीतरी वेगळं. होकायंत्र हा दिशा तरी दाखवतो. पण पावर तर धोकायंत्र आहेत, "असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

close