‘आप’ लोकसभेसाठी देशभरात जागा लढणार

January 4, 2014 6:58 PM0 commentsViews: 563

arvinda kejriwal04 जानेवारी : दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर आता आम आदमा पार्टी राष्ट्रीय पातळीवर निवडणूक लढायला सज्ज होताना दिसतेय.

आम आदमी पक्ष लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा लढवणार असा निर्णय शनिवारी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला.

येत्या एक महिन्यात लोकसभेच्या जागा आणि उमेदवार जाहीर करू असं आपचे सदस्य प्रशांत भूषण यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पक्षाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार लोकसभा निवडणुकाचा निकाल काय हाती येतो यानंतर जाहीर करू असंही भूषण यांनी सांगितलं.

close