‘दाभोलकरांचा खून मोदींच्या उदयानंतर फॅसिस्ट वृत्तीमुळेच’

January 4, 2014 7:39 PM2 commentsViews: 1389

kumar ketkar on modi04 जानेवारी : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून ही फॅसिस्ट वृत्ती आहे आणि दाभोलकरांचा खून करणारी फॅसिस्ट वृत्ती ही भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या उदयानंतर झाली आहे अशी घणाघाती टीका ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी मोदींवर केलीय. कुमार केतकर यांनी आज सासवडच्या आचार्य अत्रे नगरीत सुरू असलेल्या 87 व्या अखिल भारतीय साहित्य सम्मेलनाला हजेरी लावली. यावेळी परिसंवादात ते बोलत होते.

कुमार केतकर यांनी यावेळी मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर जोरदार टीका केली. जो मनुष्य देशामध्ये विधायक वृत्ती ऐवजी विद्वेषी वृती पसरवतो, देशाची फाळणी करण्याचं बोलू शकतो. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर देशासाठी घातक आहे असं स्पष्ट केलंय हे कुणालाही पटणार नाही पण हे खरं आहे असं परखड मत केतकर यांनी व्यक्त केलं.

तसंच पुण्यातला एक तरुण दिल्लीत गेला आणि त्याने महात्मा गांधींची हत्या केली तर त्याच पुण्यात दाभोलकर सारख्या कार्यकर्त्याचा खून झाला. हे सगळं महाराष्ट्राची संस्कृती रास झाल्याचं लक्षण आहे. दाभोलकर यांचा खून कोणत्या वातावरणात झाला हे लक्षात घेतलं पाहिजे. दाभोलकरांचा खून ही फॅसिस्ट वृत्ती आहे. आणि ही वृत्ती नरेंद्र   मोदी यांच्या उदयानंतर झाली आहे अशी टीकाही केतकरांनी केली.

केतकरांच्या टीकेला भाजपचे विधान परिषदेचे नेते विनोद तावडे यांनी उत्तर दिलंय. मराठी साहित्य संमेलन वादाशिवाय पार पडत नाही. हे कुमार केतकर यांनी पार पाडलंय. दाभोलकरांच्या मारेकर्‍यांचा अजून शोध लावण्यात सत्ताधारी असलेल्या गृहखात्याला अपयश आलं त्यावर केतकर बोलत नाही. नरेंद्र मोदींची वाढती लोकप्रियता पाहता ती सहन झाली नाही म्हणून केतकर यांच्या पोटात दुखू लागलंय. त्यामुळे केतकर यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी असी टीका केली ती निषेधार्ह आहे अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली. तसंच साहित्याच्या व्यासपीठावरुन केतकरांनी असे बोलू नये असंही तावडे म्हणाले.

 • vithal w

  is budhe ki dimagi halat thik nahi hai

 • Yashdeep Joshi

  केरळमध्ये मुस्लिम लीगशी आणि आंध्रात ‘एम.आय.एम.’या रझाक्कारी विचारांच्या पक्षाशी युती करणारा ‘काँग्रेस पक्ष’ धर्मनिरपेक्ष कसा? याचेही उत्तर मिळाले पाहिजे. आजकाल गांधीवादी म्हणवणारे लोक मोदींवर टीका करतात , परंतु ‘ वन्दे मातरमला ‘ नकार देणा-या धर्मांध मुस्लिम नेत्यांविषयी मात्र यत्किंचित बोलत नाहीत, १९३०-४० च्या दशकातील मराठवाड्यातील ‘वन्दे मातरम’ चळवळीचाही, त्यांना विसर पडला आहे.

  महाराष्ट्राचे बोलायचे झाल्यास “संभाजी ब्रिगेड – बामसेफ” सारख्या तथाकथित बहुजनवादी संघटनादेखील फॅसिस्ट वृत्ती जोपासत आहेत. या संघटनांचे कार्यकर्ते बेडेकर-बाबासाहेब पुरंदरे यांसारख्या अनेक ज्येष्ठ लोकांना हात-पाय तोडण्याची, जीवे मारण्याची धमकी देतात, पुण्यातील अनेक इतिहास संशोधकांना तशा धमक्या मिळाल्या आहेत. माननीय हरी नरके यांनी जेव्हा या संघटनांचे खरे स्वरूप उघड केले, तेव्हापासून हरी नरके यांनाही या संघटना अपशब्द वापरतात, “हरी नरके यांनी बहुजन समाज फोडण्याची सुपारी घेतल्याचा” आरोप करतात.

  साहित्य संमेलन उधळून लावण्याची कामे या संघटन करतात. जेव्हा केतकरांनी शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी हजारो कोटी खर्च करण्यापेक्षा ते पैसे सामाजिक विधायक कामांसाठी वापरण्याविषयी अग्रलेख लिहिला होता, तेव्हा या केतकरांनाही “मनुवादी केतकर” अशी उपाधी या संघटनांनी दिली होती.

  त्यात सरकारचे प्रतिनिधीही कोणतीच भूमिका न घेता “WWF MATCH” बघितल्यासारखा आनंद घेतात.

close