नरेंद्र मोदींचे नेतृत्व लोकशाहीसाठी धोकादायक -डॉ.बंग

January 4, 2014 10:10 PM4 commentsViews: 3339

bang 4404 जानेवारी : नरेंद्र मोदी जर देशाचे पंतप्रधान झाले तर देशाची 100 शकलं पडतील हे लोकशाहीसाठी चांगलं नसून मोदींचं नेतृत्व हे भारताच्या ऐक्क्यासाठी धोकादायक आहे असं परखड मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केलंय.

मोदी पंतप्रधान झाले तर देशातल्या मुसलमानांना असुरक्षित वाटेल असंही बंग म्हणाले. आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत डॉ.बंग बोलत होते. या मुलाखतीत डॉ.बंग यांनी अण्णांचं आंदोलन, आम आदमी पार्टी, राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर परखड मतं व्यक्त केली.

‘लोकांमध्ये जागरुकता आली’

2013 वर्ष हे एकप्रकारे चांगलं ठरलं. लोकं राजकीय नेत्यांना प्रश्न विचारू लागले. अनेक प्रकरणांत राजकीय नेत्यांना जेलमध्ये जावं लागलं. एवढंच नाही तर जनतेनं मतदानातून वाटेल ते वाढलेलं सहन करणार नाही हे दाखवून दिलंय. आम आदमी पार्टीसारखा नवीन पर्याय लोकांसमोर आलाय. त्यामुळे काळोखाचा काळ मागे जातोय आणि 2014 चा सूर्योदय नवीन गोष्टी घेऊन येतोय.

केजरीवाल हे पेसमेकर

आम आदमीकडून खूप मोठी क्रांती होईल अशी अपेक्षा बाळगता येणार नाही. त्यांनी काही प्रमाणावर याची सुरुवात केलीय. क्रांतीचे वेगवेगळे पर्याय यातून समोर येतील. आज काँग्रेसच्या आधारावर त्यांचे सरकार आहे. उद्या लोकसभेच्या निवडणुका लढायच्या आहेत. लोकं, पैसा उभा करावा लागणार आहे. त्यामुळे क्रांतीला एक मर्यादा आहे. जरी झालं ते गुणात्मक राहिलं पण याला मर्यादा राहिल. मेडिकलमध्ये आम्ही एक शब्द वापरतो पेसमेकर. हृदयाची गती किती असावी. तर हृदयातील एक केंद्र ही गती ठरवतो. सध्या राजकारणात अरविंद केजरीवाल हे पेसमेकर झाले आहेत. राजकीय पक्षांनी कसं वागावं याचे नवे आदर्श आणि उदाहरण ते मांडत आहे. यामुळे इतर राजकीय पक्षांची तारांबळ उडाली आहे. केजरीवाल जे करताय ते तुम्ही का करत नाही हे जनता इतर पक्षांना सवाल करत आहे. त्यामुळे इतर पक्षांना त्यांच्यासारखे मान्य नसूनही वागावे लागणार आहे. केजरीवाल यानिमित्तानं नवीन पर्याय जनतेला देतील.

मोदींचं नेतृत्व लोकशाहीसाठी धोकादायक

गुजरात हे बाहेरून विकसनशील राज्य वाटतं असलं तरी तसं काही नाही. गुजरात खूप विकसित राज्य आहे अशी फक्त जाहिरातबाजी करण्यात आलीय. गुजरातमध्ये ग्रामीण आणि आदिवासी भागांची स्थिती खराब आहे. गुजरातचा विकास शहरी, औद्योगिक आणि मध्यमवर्गीय भागापुरता मर्यादित आहे. पण ग्रामीण भागात बालमृत्यूचा दर हा बिहारपेक्षाही जास्त आहे. अनेक मोठमोठ्या कारखान्यांना मोदींनी जमिनी देऊ केल्यात. पण त्यामुळे तिथले शेतकरी दुखावलेले आहेत. तसंच 2002चा काळ पुसला जाणार नाही. गुजरातमध्ये रस्त्यारस्त्यांवर, चौकांमध्ये मोदींचे ‘नरेंद्र मोदी वॉचिंग यू’ असे पोस्टर पाहण्यास मिळतात. हे लोकशाहीसाठी काही योग्य नाही. उद्या जर भारतात नरेंद्र मोदींचे नेतृत्व आलं तर देशाची दोन-चार काय 100 शकलं पडतील. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर मुस्लिमांना असुरक्षित वाटेल. पाकिस्तान झालं तेव्हा देशाचे दोन तुकडे झाले. आता तर मुस्लीम शंभर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात आहेत त्यांनी कुठे जावं?

मोदी प्रभावी नेते पण हुकूमशाही प्रवृत्ती

गेल्या वर्षात भाजप जवळपास मृत झाला होता. भाजपमधील अंतर्गत वाद संपत नव्हते. पण नरेंद्र मोदी यांच्या आगमनामुळे भाजपला आता चेव आलाय. मोदी हे एक प्रभावी नेते पण हुकूमशाही प्रवृत्ती असं आहे. त्यामुळे निष्क्रिय, भ्रष्ट नेतृत्व आणि हुकूमशाही नेतृत्व असे दोन पर्याय आहेत. त्यामुळे पुढील वर्षभर पर्यायी राजकीय नेतृत्व आपल्यासमोर येईल. एखाद्या वेळेस काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सुधारतील किंवा ‘आप’मधून नवीन काही येईल अथवा गैरकाँग्रेसी पक्ष आहे त्यातून काही नवीन पर्याय पुढे येईल. पण ‘आप’च्या निमित्ताने आता नवीन पर्यायाला एका दृष्टीनं सुरुवात झालीय.

 • haresh

  modi pm banege voto tai he…………. kuch bhi ho jay ………….modi is next india pm

  • Dilp Chavan.

   Modimania.

 • Nishikant

  are ajun kiti varsha ekach goshta gheun radnar tumhi saheb. ki dusra kahi bolayla nahi mhanun ekch pipani vajavnaar…

 • Yashdeep Joshi

  डॉ. अभय बंग यांनी जे मत व्यक्त केलंय ते काँग्रेस समर्थक म्हणून अथवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून, हे आधी पहावं लागेल. दुसरीकडे, केरळमध्ये मुस्लिम लीगशी आणि आंध्रात ‘एम.आय.एम.’या रझाक्कारी विचारांच्या पक्षाशी युती करणारा ‘काँग्रेस पक्ष’ धर्मनिरपेक्ष कसा? याचेही उत्तर मिळाले पाहिजे. आजकाल गांधीवादी म्हणवणारे लोक मोदींवर टीका करतात , परंतु ‘ वन्दे मातरमला ‘ नकार देणा-या धर्मांध मुस्लिम नेत्यांविषयी मात्र यत्किंचित बोलत नाहीत, १९३०-४० च्या दशकातील मराठवाड्यातील ‘वन्दे मातरम’ चळवळीचाही, त्यांना विसर पडला आहे.

  माझ्या वाचनात असे अनेक गांधीवादी अनुयायी आलेत , जे गांधीजींना महान ठरवण्यासाठी सुभाषबाबू-सावरकर यांच्याविषयी धडधडीत चुकीची माहिती सांगतात . २००४ साली पुण्यातील एका साप्ताहिकात “लोकांना न कळलेला महात्मा” या लेखात संबंधित गांधीवादी लेखकाने “सुभाषबाबू हे कॉंग्रेसकडे हिटलरला पाठींबा देण्यासाठी आग्रह करत होते,” असे खोटे विधान टाकून ठेवले.

  गेल्या ५ वर्षांत मी ६ वेळा गुजरातमध्ये बारडोली-द्वारका-अंकलेश्वर-सुरत-बडोदा-अहमदाबाद या भागात कामानिमित्त जाऊन आलो आहे. माझ्या अनुभवानुसार, गुजरातमध्ये मोदींनी स्वतःच्या पक्षाचेही पोस्टर-फलक सार्वजनिक ठिकाणी अजिबात लावले नाहीत. उलट महाराष्ट्रात ठिकठिकाणी “दादा-भाऊ-अप्पा” यांच्या “वाढदिवसाच्या शुभेच्छां”चे अवाढव्य आकाराचे फलक सर्वत्र लावलेले दिसतात. तसेच गुजरात आणि कर्नाटक येथील रस्त्यांची गुणवत्ता हि आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी चांगली आहे. वाचकांनी स्वतः तेथील भागात प्रवास करावा आणि सत्य जाणून घ्यावे. रस्ते-पाणी-वीजपुरवठा-सुरक्षा आणि गुन्हेगारीचा नायनाट या बाबतीत ‘ दिल्ली-महाराष्ट्र-आसाम-युपी ‘ अशी अनेक स.पा. आणि काँग्रेसशासित राज्यं अपयशी ठरली आहेत, त्यामुळेच लोकांचा भाजपकडे कल वाढत आहे.
  अरविंद केजरीवाल यांनीही एक चांगला पर्याय दिला आहे, याविषयी दुमत असूच शकत नाही. अरविंद केजरीवाल यांनाही हार्दिक शुभेच्छा आहेत, तसेच राष्ट्रहितासाठी तळमळ करणा-या अण्णा हजारे यांच्याविषयी आम्हाला अत्यंत आदर आहे

  मोदींनी गेल्या २ वर्षांत किमान १०० सभा घेतल्या, पण त्यात त्यांनी कधीही मुस्लिमांना मारण्याची भाषा केली नाही, उलट राष्ट्रीय एकात्मतेचीच आठवण करून दिली, त्यामुळे मोदींविषयी गाधीवादी लोकांनी मांडलेलं मत आजपर्यंत तरी मला परावृत्त करू शकलेलं नाही.

close