गोव्यात इमारत कोसळली, 14 ठार

January 4, 2014 10:33 PM0 commentsViews: 254

goa bulidnig04 जानेवारी : गोव्याच्या दक्षिणेस असलेल्या काणकोण तालुक्यात बांधकाम सुरु असलेली इमारत कोसऴून 14 जणांचा मृत्यू झालाय. रुबी रेसिडेन्सी या इमारतीचं बांधकाम सुरु होतं, पण दुपारी अचानक ही इमारत कोसळली आणि यात 14 जणांचा मृत्यू झाला, तर 60 हून अधिक लोकं ढिगार्‍याखाली अडले असण्याची भिती व्यक्त करण्यात येतेय.

युद्धपातळीवर बचावकार्य सुरु असून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर स्वत: बचावकार्यावर लक्ष ठेवून आहेत. आतापर्यंत 14 मृतदेह बाहेर काढण्यात आलेत आणि 21 जणांना वाचवण्यात यश आलंय. इमारतीमध्ये 60 जण अडकल्याची भीती आहे. लष्कराच्या तुकड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. बचावकार्य वेगानं सुरू आहे.

बिल्डर, कंत्राटदार आणि महापालिकेचे अधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. चुकीचं डिझाईन आणि स्तंभ नीट बांधले नसल्यानं ही इमारत कोसळली अशी प्रतिक्रिया पर्रिकर यांनी दिली.

close