‘आप’ इफेक्ट, राज्यात 15 टक्के वीज दर कपात?

January 4, 2014 10:47 PM0 commentsViews: 513

Image img_226072_electrisity4_240x180.jpg04 जानेवारी : दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही वीज दर कमी करण्यात येणार असल्याचे संकेत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिले आहे. राणेंच्या अध्यक्षतेखालच्या समितीने 15 टक्के वीज दर कपात करण्याची शिफारस केली होती. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

बिहारचे राज्यपाल डॉ. डी.वाय.पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तच्या कार्यक्रमासाठी राणे कोल्हापूरच्या दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यामध्ये जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांसाठी 31 कोटी रुपयांचा निधीची घोषणाही राणे यांनी केलीय.

दिल्लीत आम आदमी पार्टीने सत्ता स्थापन केल्यानंतर वचनपूर्ती करत दिल्लीकरांना दर महिना 20 हजार लिटर मोफत पाणी दिले आणि त्यापाठोपाठ अर्ध्या दरात वीजचे घोषणाही केली.’आप’च्या कामाचा सपाटा पाहून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि खासदार संजय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून महाराष्ट्रातही वीज दर कमी करावे अशी मागणी केली होती.

close