राष्ट्रवादीची लोकसभेसाठी जय्यत तयारी!

January 5, 2014 12:45 PM0 commentsViews: 1211

Image img_178422_ncpon_240x180.jpg05 जानेवारी :  2014च्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केली आहे. आजपासून राष्ट्रवादीच्या नेत्यांची दोन दिवसांची बैठक मुंबईत सुरू झाली आहे. शरद पवार यांच्यासह पक्षांचे सर्व ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत. राष्ट्रवादी आपल्या वाट्याच्या जागांचा आढावा या बैठकीत घेणार असून त्याची तपशिलवार चर्चा या बैठकीत होणार आहे.

यावेळी काँग्रेसने जास्त जागांचा आग्रह धरल्याने राष्ट्रवादी कुठली भूमिका घेते हे या दोन दिवसांच्या बैठकीत ठरणार आहे. यावेळी शरद पवार हे 22 जागांसाठी आपल्या उमेदवारांची चाचपणी करणार आहेत.

दरम्यान, कातडी बचाव भूमिका चालणार नाही असं म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दम भरला आहे. लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहण्याची तयारी ठेवा असा इशारा त्यांनी पक्षातील नेत्यांना दिला आहे. राष्ट्रवादीचे काही नेते लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक नाहीत त्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे

close