‘आप’ची सदस्य नोंदणी मोहीम

January 5, 2014 1:01 PM0 commentsViews: 1220

Image yogendra_yadaw_300x255.jpg05 जानेवारी : दिल्लीत ‘आप’ली देशाच्या इतर भागांमध्येही आपची घोडदौड सुरू झालेली दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सदस्य जोडणीसाठी ‘आप’कडून आता ‘मै भी आम आदमी’ ही मोहिम येत्या 10 जानेवारी पासून देशभर राबवण्यात येणार असल्याच ‘आप’चे प्रवक्ते योगेंद्र यादव यांनी सांगितले.

आप 10 जानेवारीपासून सदस्यत्व अभियानही राबवण्यात येणार आहे. ही मोहीम 10 ते 26 जानेवारी पर्यंत राबवणार आहे. या मोहिमेतून देशभरातील कार्यकर्त्यांना जोडले जाणार आहे. त्या शिवाय या मोहिमेत सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी तीन सदस्यांची समिकी बनवण्यात येणार आहे. ही समिती पक्षाचा जाहीरनामा पासून ते निधी आणि निवडणुक संबंधी सर्व कामकाज पाहणार आहे. असं योगेंद्र यादव पत्रकारांशी बोलताना म्हणाले. त्याच बरोबर, निवडणुकीसाठीचे उमेदवारांची घोषणा लवकरच करू असं ही ते म्हणाले.

हरियाणामध्ये लवकरच होणार्‍या विधानसभा निवडणुकात आम आदमी पक्ष पर्ण शक्तीने उतरणार आहे. या ठिकाणी असलेल्या सर्व 90 जागा लढवणार अशी घोषणा आपचे सदस्य योगेंद्र यादव यांनी केली. दिल्लीच्या विजयानंतर आपकडून देशभरातून अपेक्षा आहेत, असंही यादव म्हणाले.

close