महाराजांचं भव्य-दिव्य भारताचं स्वप्न साकार करूया – मोदी

January 5, 2014 2:56 PM0 commentsViews: 1552

modi @ raigad05 जानेवारी : महाराजांचे भव्य दिव्य भारताचं हे स्वप्न आपण साकार करूया असं आव्हान भाजपचे पंतप्रधान उमेदवार नरेंद्र मोदी यांनी दिले. रायगडावर शिवप्रतिष्ठानने आज आयोजित केलेल्या महानगर ते रायगड या गडमोहिमेच्या सांगता समारंभात नरेंद्र मोदी म्हणाले. या भाषणादरम्यान, छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयजयकार करणार्‍या मोदींनी शिवाजी महाराजांचा इतिहास अयोग्यारित्या मांडण्यात आल्याची टीका केली.

शिवाजी महाराजांसारख्या महान पुरूषाचे रूप हे फक्त योदध्याच्या प्रतिमेत बंदिस्त ठेवल्याची खंत व्यक्त करताना त्यांचे कार्य खूर विराट व महान असल्याचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. त्याच बरोबर, सुरत शहरातील मोहिमे दरम्यान महाराजांनी तिथल्या लोकांचे सहकार्य घेतले होते, आणि त्यामुळेच महाराजांना औरंगजेबांचा खजिना लुटता आला. पण इतिहायात या घटनेचं वर्णन सुरत लुटली अशी केली असून हा शिवरायांचा घोर अपमान आहे, असं ही मोदी म्हणाले.

राजकीय भाष्य करणं टाळलं
दोन दिवसांन पूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदींवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर प्रथमच मोदी जाहीर कार्यक्रमात आले होते. त्यामुळे मोदी पंतप्रधानांच्या टीकेला काय उत्तर देताहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, नरेंद्र मोदींनी रायगडवरील भाषणात कोणतही राजकीय भाष्य करणं टाळलं.

close