‘जीएसएलव्ही- डी5′ चे यशस्वी लाँचिंग

January 5, 2014 2:59 PM0 commentsViews: 148

istro05 जानेवारी :  भारताच्या महत्त्वपूर्ण अशा ‘जीसॅट-14′ या उपग्रहाचे लाँच करणार्‍या ‘जीएसएलव्ही- डी5′ उपग्रहाचं यशस्वी लाँच आज रविवार श्रीहरीकोट्टा येथील भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) सतीश धवन अवकाश केंद्रावरून झाले. संध्याकाळी 4 वाजून 18 मिनिटांनी या उपग्रहाचे अवकाशात यशस्वी उड्डाण झाले.

१९८२ किलो वजनाच्या ‘जीसॅट-१४’ उपग्रहाचा दूरसंपर्क क्षेत्रासाठी उपयोग करण्यात येणार आहे. ‘जीएसएलव्ही- डी5’मध्ये वरील स्तरात भारतीय बनावटीचे निम्नताप यंत्र वापरण्यात आले आहे. दूर-शिक्षण आणि दूर-वैद्यक या क्षेत्रांतील ऍप्लिकेशन असलेला जीसॅट-14 हा संज्ञापन उपग्रह (कम्युनिकेशन सॅटेलाइट) आहे.

भारताच्या चंद्रयान-२ मोहिमेतही या मिशनचा महत्त्वाचा वाटा राहाणार आहे. या आधी तीन वर्षांत दोन वेळा या लाँचचे प्रयत्न अयशस्वी झाले होते. तर गेल्या वर्षी 19 ऑगस्टला इंधन गळतीमुळे हा लाँच रद्द करण्यात आली होती. मात्र, यावेळी यशस्वी लाँच करण्यात आल्याचे इस्त्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी सांगितले.

close