माजी क्रिकेटपटू अझरुद्दीनची नवी इनिंग सुरू

February 19, 2009 12:57 PM0 commentsViews: 3

19 फेब्रुवारी हैद्राबादक्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीननं काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आहे. आंध्रप्रदेशमधले काँग्रेसचे प्रवक्ते विरप्पा मोईली यांनी हैद्राबादमध्ये अझरुद्दीनच्या उपस्थितीत ही घोषणा केली. पण लोकसभेची निवडणूक ते लढवणार की नाही यावर मात्र त्यांनी वक्तव्य करण्याचं टाळलं. 2000मध्ये मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे अझरूद्दीनवर आजीवन बंदी आणण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यातच काँग्रेसपार्टीमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात अझरूद्दीनशी काँग्रेसची चर्चा झाली होती. आणि हैदराबादमधून निवडणूक लढवण्याची इच्छाही अझरूद्दीननं बोलून दाखवली होती. पण सध्या तरी कुठल्याही अटींशिवाय त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं मोईली यांनी सांगितलं.

close