87 व्या साहित्य संमेलनाचा समारोप

January 5, 2014 6:32 PM0 commentsViews: 329

akhil-bhartiya-sahitya-sammelan-201405 जानेवारी : सासवडमध्ये 87 व्या साहित्य संमेलनाचा काही वेळापूर्वीच समारोप झाला. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खुन ही अतिशय लांच्छनास्पद घटना असुन याचा एकमताने निषेध करण्यात आला आहे. अजुनही दाभोलकरांच्या मारेकर्‍याचा शोध लागत नाही, याबद्दल खंत व्यक्त करण्यात आली आहे. दाभोलकरांचा उल्लेख समारोपात करणार होतो, अशी सारवासारव संमेलनाध्यक्ष फ.मुं.शिंदे यांनी काही वेळापूर्वीच केली.

87 व्या साहित्य संमेलनाच्या समारोपात आज अनेक राजकारण्यांनी हजेरी लावली. पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, उद्धव ठाकरे आणि अन्य अनेक नेते आज उपस्थित आहेत.

यावेळी काही महत्त्वाचे ठराव करण्यात आले आहेत. आचार्य अत्रेंचं भव्य स्मारक मुंबईंत उभं करावं तसेच त्यांचं टपाल तिकीट काढुन भारत सरकारने त्यांचा गौरव करावा, राज्यसरकारने मराठी बालवाहिनी सुरु करावी, प्रत्येक शाळेत पुर्ण वेळ ग्रंथपाल नेमावे, बोली भाषा टिकवण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे, नोकरीमध्ये महाराष्ट्र सरकारने मराठीला प्राधान्य देणारे आवश्यक निर्णय घ्यावेत, ग्रंथनिर्मिती मंडळ पुन्हा सुरु करावे, मराठवाड्याच्या दुष्काळावर पाणी वाटपाचे धोरण राबवुन सरकारने मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, असे अनेक ठराव करण्यात आले आहेत.

close