नरोदा पाटिया हत्याकांडातल्या आरोपींनी पत्करली शरणागती

February 20, 2009 5:25 PM0 commentsViews: 7

20 फेब्रुवारी गुजरातमधल्या नरोदा पाटिया हत्याकांडातल्या दोन आरोपींनी शरणागती पत्करलीय. विश्व हिंदू परिषदेचे नेते अतुल वैद आणि भाजपचे माजी नेते मेघ सिंघ हे ते आरोपी आहेत. गोध्रा ट्रेन जळीतकांडानंतर नरोदा पाटिया हत्याकांड झालं होतं. त्यात 39 मुस्लीम ठार झाले होते तर 31 जण बेपत्ता आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी सुप्रीम कोर्टानं स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमची नेमणूक केली होती. या घटनेच्या साक्षीदारांनी वैद आणि सिंग यांचं हत्याकांडाचे सूत्रधार म्हणून नाव घेतलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या दट्‌ट्यामुळं आता सहा वर्षानंतर विश्व हिंदू परिषद आणि भाजपचे हे दोन नेते शरण आले. त्या टीमसमोर हे दोघे शरण आलेत.

close