लोकसभेचे पडघम एप्रिलमध्ये वाजणार!

January 6, 2014 9:36 AM0 commentsViews: 210

Image img_193892_electionindia_240x180.jpg06 जानेवारी : गेल्या वर्षभरापासून देशातील राजकीय वातावरण तापवणार्‍या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका येत्या एप्रिल आणि मे महिन्यापासून होण्याची शक्यता निवडणूक आयोगातल्या सूत्रांनुसार पीटीआयने वर्तवली आहे. तर या निवडणुकीसाठीचे मतदान पाच किंवा सहा टप्प्यांत होणार असून येत्या फेब्रुवारीच्या शेवटच्या किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुकीच्या कार्यक्रमांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

लोकसभेसोबतच आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम या राज्यांत विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. दरम्यान, निवडणुकीपूर्वी भ्रष्टाचारविरोधी निर्णय घेण्यासाठी सरकारतर्फे लवकरच संसदेचे विशेष अधिवेशन बोलाविले जाऊ शकते. सध्याच्या लोकसभेची मुदत 1 जूनला संपणार आहे आणि नव्या लोकसभेची स्थापना 31 मेपर्यंत करावी लागणार आहे.

निवडणुकीची जय्यत तयारी

  • यंदा 80 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्याची शक्यता आहे. मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून नवीन मतदार नोंदणी प्रक्रिया जानेवारीअखेर पूर्ण होईल.
  • लोकसभा निवडणुकीसाठी आठ लाख मतदान केंद्र असणार आहेत. त्यासाठी सुमारे 12 लाख मतदान यंत्रांचा वापर होणार असून 2.5 लाख नवीन मतदान यंत्रे वापरण्यात येणार आहे.
  • 1.1 कोटी निवडणूक कर्मचार्‍यांची फौज असून त्यापैकी 50 टक्के सुरक्षेसाठी तैनात असतील

आढावा 2009च्या निवडणुकीचा

  • 2009 लोकसभा निवडणूक पाच टप्प्यांत झाली होती
  • 2 मार्च 2009 रोजी निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती.
  • 16 एप्रिल ते 13 मे दरम्यान निवडणूक प्रक्रिया पार पडली.
  • 16 मे 2009 रोजी निवडणुक ांचा निकाल जाहीर करण्यात आला.
close