‘आप’च्या मंत्री राखी बिर्ला यांच्या ताफ्यावर हल्ला

January 6, 2014 10:25 AM0 commentsViews: 1590

rakhi-birla-52c977089299a_exl06 जानेवारी : दिल्लीच्या महिला आणि बालकल्याणविकास मंत्री राखी बिर्ला यांच्यावर काल काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला.

आम अदमी पक्षाचे नेते राखी बिर्ला काल संध्याकाळी 6 वाजता मंगोलपुरी भागातून जात असताना काही हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्या गाडीची काच फोडून तिथुन फरार झाले.

या सगळ्यात बिर्ला यांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मंगोलपुरी हा राखी बिर्ला यांचा मतदारसंघ आहे. राखी बिर्ला या अरविंद केजरीवाल सरकारमधल्या सर्वात तरुण आणि एकमेव महिला मंत्री आहेत.

close