प्रणव मुखर्जी यांना चिंता जागतिक मंदीची

February 20, 2009 5:32 PM0 commentsViews: 3

20 फेब्रुवारी, नवी दिल्ली प्रभारी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी जागतिक मंदी संदर्भात चिंता व्यक्त केलीय. मंदीच्या परिणामांची तीव्रता वाढत असताना नोकरी टिकवून ठेवणं ही सध्याची अत्यंत महत्त्वाची गरज असल्याचं ते म्हणाले. कॉर्पोरेट्सनीही स्वत:च्या पगारात घट करावी अशी सूचनाही त्यांनी बोलताना केलीय. " मंदीची झळ कमी करण्यासाठी भारतासारख्या प्रगतीशील अर्थव्यवस्थेत मालासाठी अंतर्गत मागणी वाढणं गरजेचं आहे. नोकर्‍या टिकणं महत्त्वाचं आहे त्यासाठी काहीजणांच्या पगारात घट झाली तरी चालेल, " असं प्रभारी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी म्हणाले.

close