तेलगू अभिनेता उदय किरणची आत्महत्या

January 6, 2014 10:56 AM0 commentsViews: 2287

uday-4 (1)06 जानेवारी : तेलगू चित्रपट अभिनेता उदय किरण याने रविवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे तेलुगू चित्रपटसृष्टीत खळबळ उडालीये. उदयने हैदराबादमध्ये त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

किरणची पत्नी विशीताने त्याला खोलीत गळफास घेतलेल्या स्थितीत पाहताच शेजार्‍यांच्या मदतीने त्याला अपोलो रूग्णालयात दाखल केलं. पण तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. 33 वर्षांच्या उदय किरणनं 19 चित्रपटांत काम केल होतं. त्याने डिप्रेशनमुळे आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नुवु नेनु, चित्रम्, मनसु हे त्याचे काही गाजलेले चित्रपट होते.

close