नारायण मूर्ती यांनी सत्यमवर घातले आर्थिक निर्बंध

February 20, 2009 5:37 PM0 commentsViews: 4

20 फेब्रुवारी सत्यम इन्फोटेकचे वरिष्ठ अधिकारी आता विमानाच्या बिझनेस क्लासऐवजी इकॉनॉमी क्लासनं प्रवास करतील. ज्या शहरांमध्ये कंपनीचं गेस्ट हाऊस आहे अशा शहरात अधिकार्‍यांना हॉटेलमध्ये राहता येणार नाही. तसंच परदेशात कोणत्याही प्रकारचं ट्रेनिंग दिलं जाणार नाही. कंपनीला घोटाळ्यातून बाहेर काढण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी हा उपाय केला गेलाय. आरती सत्यमचे नवे सीईओ ए. एस. मूर्ती यांनी सर्व कर्मचार्‍यांना एक ई-मेल केलाय. यात कंपनीच्या प्रत्येक युनिटनं आपला खर्च साठ टक्क्यांनी कमी करावा, असं मूर्ती यांनी स्पष्ट केलंय.

close