वायव्य सरहद्द प्रांतात स्फोट : 35 ठार, 70जखमी

February 20, 2009 5:40 PM0 commentsViews: 2

20 फेब्रुवारी, डेरा पाकिस्तानमध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 35 जण ठार तर 70 जण जखमी झालेत. वायव्य सरहद्द प्रांतातल्या डेरा इस्माईल खान या शहरात हा स्फोट झाला. डेरा इस्माईल खान इथं एका शिया पंथाच्या मुस्लीम धर्मगुरुची अंत्ययात्रा जात असताना ही घटना घडली. 15 ते 17 वर्षाच्या सुसाईड बॉम्बरनं स्फोट घडवला. या स्फोटात 35 जण ठार झाले. यामुळे धर्मगुरूंच्या अंत्ययात्रेतील्या लोकांनी दंगल माजवली आणि पोलिसांच्या गाड्यांवरही हल्ला केला. यानंतर पोलिसांनी या भागात कर्फ्यू लागू केला.

close