विचारांचा मुकाबला विचारांनीच करावा -निखिल वागळे

January 6, 2014 10:15 PM0 commentsViews: 1334

23425 nikhil wagle ibn lokmat06 जानेवारी : विचारांचा मुकाबला विचारांनीच केला पाहिजे, एखादा विचार पटत नसेल तर लोकशाही मार्गानंच त्याला विरोध केला पाहिजे, दहशतीच्या मार्गानं पत्रकारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेतलं जाणार नाही, असं मत आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी मांडलं.

पत्रकार दिनानिमित्त ठाणे महापालिकेत आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात डॉ. दाभोलकरांच्या खूनाच्या तपासाला विलंब होत असल्याबद्दल सरकारचा निषेध करण्यात आला.

तर ज्येष्ठ पत्रकार एस.रामकृष्ण अय्यर यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. महापौर हरिश्चंद्र पाटील, मनपा आयुक्त असीम गुप्ता यावेळी उपस्थित होते.

close