INS विक्रमादित्य अरबी समुद्रात दाखल

January 6, 2014 10:27 PM1 commentViews: 1137

ins vikramaditya06 जानेवारी : भारतीय नौदलाची ताकत वाढवणारी INS विक्रमादित्य ही विमानवाहू युद्धनौका अरबी समुद्रात दाखल झालीय. आता ती लवकरच भारतीय नौदलाच्या ताफ्यात तैनात होणार आहे. रशियाकडून भारतानं ही युद्धनौका घेतलीय.

जवळपास पावणे दोन महिन्यांचा प्रवास करत विक्रमादित्य अरबी समुद्रात आली आहे. INS विक्रमादित्य सेवमॅश शिपयार्डमध्ये रशियाकडून भारताच्या ताब्यात देण्यात आलीय. INS विक्रमादित्य युद्धनौकेचं वजन 44 हजार 500 टन आहे. तर लांबी 284 मीटर आहे.

खोल समुद्रात ही युद्धनौका ताशी 90 किलोमीटर वेगाने प्रवास करु शकते.  या अवाढव्य युद्धनौकेसाठी भारतीय नौदल तळांवर विषेश गोदी देखिल बणवण्यात आलीय.या युद्धनौकेवर भारताचे सर्व चॉपर्स तसेच मीग विमानं देखिल राहु शकणार आहेत. त्यामुळे आता हिंदी महासागरात भारतीय नौदल अधीक सक्षम होणार आहे.

  • pratik

    Nice1

close