राष्ट्रवादी विरोधात ‘आप’ लोकसभेच्या रिंगणात ?

January 6, 2014 11:24 PM1 commentViews: 1963

aam admi 406 जानेवारी : दिल्लीतल्या यशानंतर उत्साह वाढलेल्या आम आदमी पार्टीने आता महाराष्ट्रावर लक्ष केंदि्रत केलंय. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांविरुद्ध आप उमेदवार उभे करणार असल्याचं पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांनी जाहीर केलंय.

सिंचनातला भ्रष्टाचार उघडकीस आणणारे विजय पांढरे नाशिकमधून छगन भुजबळ यांच्याविरोधात उभे राहण्याची शक्यता आहे. तर इतरही काही बड्या नेत्यांच्या विरोधात आप प्रसिद्ध चेहेरे देण्याची शक्यता आहे. तर  दुसरीकडे राष्ट्रवादीने मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय.

पवारांनी लोकसभेसाठी आपली टीमही जाहीर केलीय. यामध्ये बारामतीतून सुप्रिया सुळे, मुंबई संजय दिना पाटील, कल्याण आनंद परांजपे, नवी मुंबई संजीव नाईक, नाशिक समीर भुजबळ, बीड धनंजय मुंडे कोल्हापूर धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक आणि मावळमधून लक्ष्मण जगताप अशीही टीम असणार आहे. एकंदरीतच लोकसभेसाठी राष्ट्रवादीने मोर्चेबांधणीला जोरदार सुरूवात केली असून लवकरच उमेदवारांची नावं जाहीर होणार असल्याची शक्यता आहे.

  • pravin mumbai

    MODI MODI HAI BAKI SAB CHOR HAI……AOUR YE AAP PARTY DUR DUR TAK DIKHAYEE NAHI DETI MAHARASTRA ME

close