सीबीडीत प्रेयसीची गळा चिरून हत्या

January 7, 2014 10:25 AM0 commentsViews: 923

kolhapur serial killers07 जानेवारी : लग्नाच्या मुद्यावरून झालेल्या वादाला कंटाळून प्रियकरानंच प्रेयसीची हत्या केल्याची घटना नवी मुंबईतल्या सीबीडी-बेलापूरमध्ये काल घडली.गणेश सूर्यवंशी यानं आपली प्रेयसी निशा शाहीन हिची गळा चिरून हत्या केली. या हत्येनंतर  प्रियकर गणेश सूर्यवंशी स्वतः सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. शाहीन नेरूळमधल्या डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये एमबीएच्या दुसर्‍या वर्षात शिकत होती.

नवी मुंबईतल्या सीबीडी बेलापूर इथल्या सेक्टर-3 मधील एफ-3या इमारतीत आपल्या बहिणीसोबत राहत होती. शाहीनची बहीण घरी नसताना सांध्याकाळी तिने गणेश आपल्या घरी बोलवलं. त्यांच्यात लग्नाच्या विषयावरुन त्यांच्यामध्ये जोरदार भांडणं झाली. या वेळी संतापलेल्या गणेशने रागाच्याभरात किचनमधला चाकू घेऊन तिच्या गळ्यावर वार केलं. गणेशने स्वतः पोलिसांना शरन जाऊन ही माहिती दिली.

close