युपीत लष्कर-ए-तोयबाचा पाय रोवण्याचा प्रयत्न?

January 7, 2014 12:30 PM0 commentsViews: 508

terror07 जानेवारी : लष्कर-ए-तोएबा ही दहशतवादी संघटना उत्तर प्रदेशातल्या पश्चिम भागामधून सदस्य नेमण्याचे प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे. सीएनएन आयबीएनला मिळालेल्या माहितीनुसार लष्कर-ए-तोएबा उत्तर प्रदेशातल्या दंगलग्रस्त भागांतल्या युवकांच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेला मिळाली आहे.

डिसेंबरमध्ये मेवात मधून अटक करण्यात आलेल्या दोघांच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. यात एका सेमिनरीच्या शिक्षकाचाही समावेश आहे. सप्टेंबरमध्ये मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलींनंतर शेकडो मुस्लिमांना मदतछावण्यांमध्ये रहावे लागले होते. या दंगली हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आल्यामुळे मुस्लीम समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान, राहुल गांधी यांनी यासंबंधी वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यावरून बरंच राजकारणही रंगलं होतं.

close