लिट्टेचा कोलंबो शहरावर हवाई हल्ला

February 21, 2009 4:58 AM0 commentsViews: 1

21 फेब्रुवारी कोलंबोगेल्या काही महिन्यात श्रीलंकन लष्कराच्या आक्रमणापुढे झुकलेल्या लिट्टेनं शुक्रवारी रात्री अचानक कोलंबो शहरावर हवाई हल्ला केला. लिट्टेच्या दोन लढाऊ विमानांनी हे हल्ले केलेत. या हल्ल्यांमध्ये दोन जण ठार झाले आहेत तर 54 जण जखमी झालेत. श्रीलंकेच्या महसूल विभागाच्या बिल्डिंगवर हा हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे श्रीलंकन हवाईदलाच्या मुख्यालयाजवळ ही बिल्डिंग आहे. दरम्यान हवाईदलानं या विमानांना उडवलं आहे. यातल्या एका विमानाच्या पायलटचा मृतदेह लष्करानं ताब्यात घेतला आहे. तर कातुनायके हवाईतळाजवळ एका विमानाचे अवशेषही ताब्यात घेण्यात आले आहेत.

close